Key Features education System Maharashtra

महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था (2026) – संपूर्ण माहिती (Key Features of educational System in Maharashtra and list of universities)

Key Features education System Maharashtra. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था ही भारतातील सर्वात मोठ्या आणि विकसित शैक्षणिक प्रणालींपैकी एक आहे. येथे प्राथमिक शिक्षणापासून ते जागतिक दर्जाच्या संशोधन विद्यापीठांपर्यंत संपूर्ण रचना उपलब्ध आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी फुले-शाहु-आंबेडकर या विचारधारेला वाहून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा सर सामान्यांच्या दारात आणली.

रयत शिक्षण संस्थेच्या सुरवातीच्या काळात अण्णांनी अगदी अनवाणी गावोगाव फिरून बहुजनांची मुले “कमवा आणि शिका” या स्वाभिमानी मंत्रावर आपल्या संस्थेत दाखल केली. कर्मवीरांच्या नंतर पहिल्या फळीतील सामाजिक आणि राजकीय लोकांनी शिक्षण संस्था उभा करत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवून आणली. लोकनेते वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना विनाअनुदानित तत्वावर त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालये चालवण्यासाठी दिलेली परवानगी हे आदरणीय डॉ. डी. वाय. पाटील आणि लोकनेते पतंगराव कदम यांना वरदानच लाभलं आणि त्यांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी अभियांत्रिकीचे दरवाजे उघडले. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था ही एक महत्त्वाची बाब आहे, जी संपूर्ण राज्याची शैक्षणिक प्रगती दर्शवते.

1) प्रमुख राज्य विद्यापीठे (Traditional Universities)

University of Mumbai Home Page : University of Mumbai

University of Mumbai हे भारतातील अत्यंत जुने आणि प्रतिष्ठित विद्यापीठ असून त्याची स्थापना १८५७ मध्ये Wood’s Education Dispatch च्या पार्श्वभूमीवर झाली. हे भारतातील पहिल्या तीन विद्यापीठांपैकी एक आहे. १९९६ मध्ये शहराचे नाव बदलल्यानंतर “बॉम्बे विद्यापीठ” चे नाव अधिकृतपणे “मुंबई विद्यापीठ” करण्यात आले. National Assessment and Accreditation Council (NAAC) ने २००१ मध्ये ५-स्टार आणि २०१७ मध्ये A++ असा उच्च दर्जा प्रदान केला.

मुंबई हे एक जागतिक दर्जाचं शहर आहे आणि बहुराष्ट्रीय कंपनी व उद्योग जगतात लागणार कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम बनवणे राबवणे हे प्राथमिक ध्येय आहे. संपूर्ण मुंबई शहर, उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक महाविद्यालयातून मुबई विद्यापीठ घराघरात पोचलेलं आहे.

Savitribai Phule Pune University Savitribai Phule Pune University, One of the Premier Universities in India – Official Website.

छत्रपती शिवरायांनी जिथे माँसाहेब जिजाऊंसोबत स्वराज्याचा धडा गिरवला ते पुणे शहर आणि त्याच पुण्यातील शनिवार वाड्यातून मराठा साम्राज्याचा कारभार चालला. या ऐतिहासिक शहराला शिक्षणाची परंपरा आहे, अनेक देशभक्त, नामांकित वकील, शिक्षण, सामाजिक परिवर्तन, कायदा, उद्योग आणि पत्रकारिता अशा अनेक विषयात इथे मोठं मोठे महारथी होऊन गेले ज्यांचं स्मरण आणि कार्य अजूनही अविरत चालू आहे.
पूर्वी पुणे विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर स्थापन होईपर्यंत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था या अंतर्गत येत होती. पुढे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महिला शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील महान कार्याला सन्मान म्हणून विध्यापीठाच नामांतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं करण्यात आले.
संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांची ओढ असते त्यामुळे पुणे हे शिक्षणाचे माहेरघर झालं आहे.

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University (RTMNU) हे १९२३ मध्ये स्थापन झालेले मध्य भारतातील एक महत्त्वाचे विद्यापीठ आहे. सुमारे ३७३ एकर परिसरात पसरलेले हे विद्यापीठ हिरवाई, ऐतिहासिक वास्तू आणि जैवविविधतेसाठी ओळखले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर आधारित शैक्षणिक संस्कृती हे त्याचे वैशिष्ट्य आहे. Nagpur भारताच्या मध्यभागी असल्यामुळे उत्तम संपर्क सुविधा असल्याने देशभरातील विद्यार्थ्यांसाठी हे विद्यापीठ आकर्षणाचे केंद्र आहे.

Shivaji University Shivaji University, Kolhapur – One of the oldest and premier Universities in India

मराठा स्वराज्याची ऐक गादी असणार महाराणी ताराबाई साहेब आणि राजर्षी शाहू महाराज यांचं कोल्हापूर. कोल्हापूर मध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून १९६२ साली लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. विद्यानगरी म्हणून असणाऱ्या या भागात विद्यापाठाची मुबलक जमीन आणि मुख्य वास्तु त्यापुढे छत्रपतींचा अश्वारूढ भव्य पुतळा हे सर्वच मनमोहक आहे प्रेरणादायी आहे.
आजरोजी विविध पदवी व पदव्युत्तर कोर्सेस मार्फत कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विद्यापीठ कार्यरत आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University | Official Website

  • छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

Sant Gadge Baba Amravati University Sant Gadge Baba Amravati University, Amravati, Maharashtra, India

  • विदर्भातील महत्त्वाचे विद्यापीठ

Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University Home > Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

  • जळगाव विभाग

Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Punyashlok Ahilyadevi Holkar University, Solapur

  • सोलापूर जिल्हा

Gondwana University Gondwana University

  • गडचिरोली व चंद्रपूर

2) मुक्त व दूरस्थ शिक्षण

Yashwantrao Chavan Maharashtra Open University Welcome to Yashwantrao Chavan Maharashtra Open University

  • नाशिक
  • नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शिक्षण

3) तांत्रिक व अभियांत्रिकी संस्था

Indian Institute of Technology Bombay Home | भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई

  • पवई, मुंबई
  • जागतिक दर्जाचे इंजिनिअरिंग व रिसर्च

Visvesvaraya National Institute of Technology Nagpur Visvesvaraya National Institute of Technology (VNIT), Nagpur

  • देशातील प्रमुख NIT पैकी एक

Dr. Babasaheb Ambedkar Technological University Dr.Babasaheb Ambedkar Technological University – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ

  • रायगड (लोणेर)
  • महाराष्ट्रातील सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेसशी संलग्न

4) आरोग्य शिक्षण विद्यापीठ

Maharashtra University of Health Sciences Welcome to MUHS

  • नाशिक
  • MBBS, BDS, Nursing, Pharmacy अभ्यासक्रम

5) कायदा विद्यापीठ

Maharashtra National Law University Mumbai Maharashtra National Law University Mumbai

  • कायदा शिक्षणासाठी विशेष राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठ

6) कृषी विद्यापीठे

Mahatma Phule Krishi Vidyapeeth (Rahuri) MPKV Rahuri

  • पश्चिम महाराष्ट्र कृषी संशोधन

Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth (Akola) Dr. P. D. Krishi Vidyapeeth, Akola

  • विदर्भ कृषी विकास

Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (Parbhani) Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani

  • मराठवाडा कृषी शिक्षण व संशोधन

Dr. Balasaheb Sawant Kokan Krushi Vidyapeeth (Dapoli) Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli (Agricultural University)

कोकण कृषी शिक्षण व संशोधन

प्रामुख्याने कोकणातील युवावर्ग नोकरी निमित्त मुंबई मध्ये स्थलांतरित झाला आहे आणि गावी वृद्ध लोक जास्त दिसून येतात. अशावेळी शेती हि फक्त पारंपरिक पद्धतीने करण्याकडे जास्तीत जास्त कल दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोकण विभागातील विद्यापीठ म्हणून या संस्थेपुढे खूप मोठं आव्हान होते. विद्यापीठच्या माध्यमातून अनेक तांत्रिक व बिगर तांत्रिक अभ्यासक्रम राबवून तसेच कोकणच्या माती वातावरणामध्ये असणारी नैसर्गिक संजीवनी याचा पुरेपूर वापर करून नवनवीन पिकांचे संकर तयार होत आहेत.
विद्यापीठ प्रामुख्याने खालील उपक्रम राबवते –
वेगवेगळ्या विभागांमधील शिक्षण एकत्र करून समन्वय साधून कृषी आणि संबंधित विज्ञानातील शिक्षण प्रदान करणे आणि विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे, पदवी, डिप्लोमा, प्रमाणपत्रे आणि इतर शैक्षणिक गौरव प्रदान करणे. Technical courses available B.Tech, M.Tech & Ph.D in Agree Engineering along with bachelor’s degree courses in Agriculture, Biotechnology and Fisheries.
कोकण क्षेत्रातील कृषी, बागायती, पशुपालन, मत्स्य आणि कृषी-संबंधित क्रियाकलापांच्या उत्पादकतेत सुधारणा करण्यासाठी मूलभूत, लागू, स्वीकार्य आणि गरजेनुसार संशोधनाद्वारे संशोधनाचा पाया प्रदान करणे, जे राज्याच्या आर्थिक वाढी आणि आत्मनिर्भरतेसाठी उपयुक्त असेल.
नैसर्गिक संसाधनांचे संपूर्ण संवर्धन आणि त्यांचा शाश्वत वापर करण्यासाठी योग्य योजना विकसित करणे.
तंत्रज्ञानाचे प्रथम हस्तांतरण यांचा समावेश करून एक्ष्टेन्शन शिक्षण कार्यक्रम सुरू करणे आणि मार्गदर्शन करणे, प्रशिक्षणासाठी तंत्रज्ञान सेवा देणे, प्रदर्शन करणे आणि योग्य संप्रेषण नेटवर्क विकसित करणे.
पीक उत्पादन, संरक्षण, कापणी, विपणन, पश्चात-कापणी वापर आणि तसेच पशुधन, कोंबडीपालन आणि मत्स्यतंत्रज्ञानाचे मानकीकरण करून जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचे मानक स्थापित करणे.

7) अभिमत (Deemed) व खासगी विद्यापीठे

Tata Institute of Social Sciences (TISS, Mumbai) Welcome to TISS

  • समाजशास्त्र व सामाजिक संशोधन

Symbiosis International University (Pune) www.siu.edu.in

  • Management, Law, IT शिक्षणासाठी प्रसिद्ध

Homi Bhabha National Institute (Mumbai) Homi Bhabha National Institute

  • Atomic energy व research आधारित शिक्षण

DY Patil University (Navi Mumbai) https://dypatiluniversityonline.com/

  • Medical, Engineering, Management

Bharati Vidyapeeth Deemed University (Pune) Best University in Mumbai, Pune, Maharashtra | BVDU

  • बहुशाखीय शिक्षण संस्था

8) महाराष्ट्र शिक्षण व्यवस्थेची रचना

प्राथमिक शिक्षण

  • इयत्ता 1 ते 8
  • सरकारी व खाजगी शाळा

माध्यमिक शिक्षण

  • इयत्ता 9 ते 12
  • SSC आणि HSC बोर्ड

उच्च शिक्षण

  • BA, BSc, BCom, Engineering, Medical, Law

संशोधन शिक्षण

  • PhD, MPhil आणि advanced research programs

9) महाराष्ट्र शिक्षण व्यवस्थेची वैशिष्ट्ये

  • 40+ विद्यापीठे
  • हजारो महाविद्यालये
  • प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • तांत्रिक, कृषी आणि आरोग्य शिक्षणासाठी स्वतंत्र प्रणाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *