Karj Mafi Yojana Scheme 2026 (शेतकरी कर्जमाफी योजना २०२६)
प्रस्तावना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६
महायुती मधील प्रमुख घटक पक्षांनी भारतीय जनता पार्टी (भाजपा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) त्यांच्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. तसेच जे शेतकरी नियमित कर्ज भरत असतील त्यांना प्रोत्साहन देण्याचाही उल्लेख करण्यात आला होता.
महायुतीने विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना चालू केली आणि प्रचंड बहुमताने सत्तेवर आल्यावर चालू देखील ठेवली. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कर्जमाफीकडे Karj Mafi Yojana आस लावून आहेत.
याअगोदर महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराम फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली होती आणि त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना झाला होता. २०२६ च्या कर्जमाफीसाठी शासन कडून अजून तरी अटी शर्ती लागू केल्याचं प्रसिद्ध केलेलं नाही.
साधारणपणे सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असणार पिक कर्ज सरकार कर्जमाफी अंतर्गत माफ करेल आणि तशी सर्व माहिती विकास सोसायटी व बँक कडून सरकारकडे जमा केलेली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५०००० रुपये पर्यंत प्रोत्साहन देण्यात येईल परंतु त्याच्याही पात्रता अटी शर्ती अजून प्रसिद्ध नाहीत.
लाभ
ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आहे, त्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे.
पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ केले जाईल.
त्यामुळे अनेक वर्षांपासून वाढत असलेली कर्जाची रक्कम एकाच वेळी कमी होईल.
हा निर्णय आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
सरकारने नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
वेळेवर हप्ते भरलेल्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांना भविष्यातही नियमित कर्जफेड करण्याची प्रेरणा मिळेल.
